incredible paithani saree most like collection
पैठणी हा महाराष्ट्राचा मानबिंदू. पूर्वी पदरावर पोपट आणि मोर इतकेच डिझाइन्स असत. आता पदरावरच नाहीतर काठावरही पानाफुलांची नक्षी , वाद्ये असं काहीकाही दिसून येतं. आंतरजालावर थोडं गुगगलंत तर पुन्हा एकदा पैठणी घ्यायचा मोह व्हायचा राहणार नाही. पदराच्या लांबीवर पैठणीची किंमत ठरते. तसंच पारंपारिक पैठण्या या नवीन पानाफुलांच्या पैठणीपेक्षा तुलनेने स्वस्त असतात. फक्त नुसतीच हौस करायची असेल तर सेमीपैठणीचा पर्यायही आहेच. फक्त कृत्रिम रेशमातली पैठणी कुणी दुकानदार गळ्यात मारत नाही ना याकडे लक्ष द्यायला हवं